गांजा विक्री केल्याप्रकरणी सावंतवाडी एकजण ताब्यात
अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल.. सावंतवाडी प्रतिनिधी गांजा विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीला स्थानिक पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे. जावेद पीरसाब शेख (वय ३८, रा. मोरडोंगरी) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून सुमारे ३० ते ४० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याच्यावर अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे….
