महिला सुरक्षेसाठी सावंतवाडी रेल्वे स्थानकावर ‘सेफ्टी ऑडिट’ संपन्न
सावंतवाडी, प्रतिनिधी दि. २९ जून: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि PRI-CBO कन्वर्जन्स प्रोजेक्ट अंतर्गत महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेने आज सावंतवाडी रेल्वे स्थानकावर महिलांच्या सुरक्षिततेबाबत विशेष ‘सेफ्टी ऑडिट’ (सुरक्षा पडताळणी) आयोजित केले. महिलांना सुरक्षित प्रवासाचे वातावरण मिळावे या उद्देशाने सकाळी आणि रात्री अशा दोन सत्रांत हे महत्त्वपूर्ण अभियान राबवण्यात आले. या ‘सेफ्टी ऑडिट’मध्ये रेल्वे स्थानकावरील…
