विवाहितेला पती,सासू,सासरे,दीर यांच्याकडून मारहाण
चौघा विरोधात गुन्हा दाखल,हिर्लोक येथील घटना कुडाळ प्रतिनिधी आपला पती, सासू, सासरे व दीर या चौघांनी शिवीगाळ करून हाताने व काठीने मारहाण केल्याची फिर्याद हिर्लोक राणेवाडी येथील सौ. सविता वैभव बरगडे (35) यांनी मंगळवारी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. ही घटना रविवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पती वैभव पांडुरंग बरगडे, सासू प्रतिज्ञा पांडुरंग बरगडे,…
