भात पिकाच्या आधारभूत किंमतीत केवळ ६९ रु. ची वाढ करून मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या सन्मानाची केली चेष्टा
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांची टीका कणकवली प्रतिनिधी शेतमजूर मिळत नसल्याने बदलत्या काळानुसार कोकणातील शेतकऱ्यांना शेत नांगरणी,भात लावणी, भात कापणीची कामे कृषी यंत्रांद्वारे करावी लागत आहेत. कृषी यंत्रासाठी लागणाऱ्या पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. भात बियाण्यांचे दर,खतांचे दर दुप्पट वाढले आहेत.त्यामुळे भात पिकाचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्याचबरोबर अतिवृष्टी, पूरस्थिती, करपा रोग…
