राज्यात पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरु :भोसले इन्स्टिटयूटमध्ये शासकीय प्रवेश सुविधा केंद्र
सावंतवाडी प्रतिनिधी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता पदविका अभियांत्रिकीची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया शासनातर्फे सुरू करण्यात आली आहे. तंत्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या परीपत्रकानुसार २० मे ते १६ जून या कालावधीत विद्यार्थी ऑनलाइन अर्ज भरू शकतात. यासाठी शासनाने जिल्हानिहाय प्रवेश सुविधा केंद्र सुरु केली असून यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सावंतवाडी येथे एफसी-३४७० या क्रमांकाचे केंद्र उपलब्ध आहे….
