संदीप गावडे यांच्याकडून सावंतवाडी नगरपरिषदेतील आरोग्यदूतांना रेनकोट वाटप
सावंतवाडी प्रतिनिधी आपला वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने, सामाजिक बांधिलकी जपत संदीप गावडे यांनी सावंतवाडी नगरपरिषदेच्या आरोग्यदूतांना (सफाई कर्मचाऱ्यां) रेनकोट वाटप केले. पावसाळ्यात नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या य कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गावडे यांनी हा उपक्रम राबवला. यावेळी गेळे सरपंच सागर ढोकरे, माजी नगरसेवक आनंद नेवगी, दिपक म्हापसेकर, भाई राणे हे उपस्थित होते….
