आंदुर्ले येथे डिजिटल आंबा शेतीशाळा व भात बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न
कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले गावामध्ये महाराष्ट्र शासन कृषि विभाग, पानी फाऊंडेशन व कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली व ग्रामपंचायत आंदुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंबा लागवड व्यवस्थापन डिजिटल शेतीशाळा तसेच भात बीजप्रक्रिया व बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. या दोन्ही उपक्रमांना आंदुर्ले मधील कृषी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आंदुर्ले ग्रामपंचायत येथे रात्री ७.३०–९.३०…
