प्रेमी युगुलाने केलेल्या आत्महत्येला “तो” हरवलेला मोबाईलच कारणीभूत

पोलीस तपासात मोठी माहिती समोर,

कणकवली प्रतिनिधी
तालुक्यातील तरंदळे धरणावर प्रेमी
युगुलाने केलेल्या आत्महत्येला ‘तो’ हरवलेला मोबाईलच कारणीभूत ठरला असल्याची बाब पोलीस तपासामध्ये पुढे येत आहे. सोहम चिंदरकर (१८, कलमठ – कुंभारवाडी) याने घरातून निघण्यापूर्वी आपल्या आईच्या मोबाईल वरून ईश्वरी राणे (१८, कणकवली – बांधकरवाडी) हिला कित्येक ‘व्हॉट्सऍप मेसेज’ केले आहेत. त्यामध्ये हरवलेल्या मोबाईलमुळेच आपण आत्महत्या करत असल्याचे सोहमने म्हटले आहे. तर आपण दोघांनीही जीवन संपवूया, असे ईश्वरी हिने म्हटल्याची बाब पोलीस तपासामध्ये पुढे येत आहे. सोहम याने ईश्वरी याला अनेक मेसेज केले. यामध्ये ‘माझा मोबाईल हरवला आहे. मोबाईल मध्ये काही आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ आहेत. सदर मोबाईल कोणाला मिळाल्यास माझी मोठी बदनामी होईल. त्यामुळे मी माझे जीवन संपवत आहे.’, असे मेसेज केले आहेत. याचवेळी ईश्वरी ही सोहम याला समजावत असल्याचेही ‘मेसेज’, मधून दिसून आले आहेत. मात्र, सोहम ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने ईश्वरी हिने, ‘तुझ्याशिवाय मी एकटी कशी जगू?’ असा सवाल करत आपण दोघांनीही एकत्रितरित्या जीवन संपवूया, असे म्हटल्याची बाब पोलीस तपासात पुढे येत आहे. दोघांनी एकत्र कुठे भेटायचे, ही बाबही या मेसेज संभाषणामध्ये ठरली. त्यानुसारच सोहम आणि ईश्वरी यांनी एकत्रितरित्या तरंदळे धरण गाठले व पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली, असे तपासात पुढे येत आहे. दरम्यान सोहम याचा हरवलेला मोबाईल सापडला

की नाही, याविषयी माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page