सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सप्टेंबर 2025 अखेरच्या तिमाहीची जिल्हा समन्वय व कर्ज पुनरावलोकन समिती (DCC/DLRC) बैठक दिनांक ११ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.
या बैठकीत जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी क्षेत्रनिहाय उद्दिष्ट पूर्तता, जिल्ह्याचा CD Ratio, पिक कर्ज वितरण, मत्स्य व पशुसंवर्धन क्षेत्रातील प्रगती, तसेच CMEGP, PMEGP, PMFME, AIF यांसह विविध योजनांचा सविस्तर आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
या वेळी RBI LDO अरुण बाबू यांनी महत्त्वपूर्ण मुद्दे जिल्हाधिकारी यांना सांगितले.
यावेळी CMEGP, SHG, PMFME यांसारख्या योजनांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या बँकांचे विशेष कौतुक करण्यात आले. तसेच Unclaimed Deposit मोहिमेचेही पुनरावलोकन करण्यात आले.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे,RBI LDO अरुण बाबू, अग्रणी जिल्हा प्रबंधक ऋषिकेश गावडे, APD-DRDA श्री. बेहरे, CEO SDCC Bank श्री. गावडे, DDA श्री. बडे, FDO श्री. महाडवाला, उद्योग विभाग, KVIB विभाग आणि विविध बँकांचे समन्वय अधिकारी तसेच महामंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हा समन्वय व कर्ज पुनरावलोकन समितीची बैठक संपन्न..
