सावंतवाडी प्रतिनिधी
आपला वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने, सामाजिक बांधिलकी जपत संदीप गावडे यांनी सावंतवाडी नगरपरिषदेच्या आरोग्यदूतांना (सफाई कर्मचाऱ्यां) रेनकोट वाटप केले.
पावसाळ्यात नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या य कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गावडे यांनी हा उपक्रम राबवला.
यावेळी गेळे सरपंच सागर ढोकरे, माजी नगरसेवक आनंद नेवगी, दिपक म्हापसेकर, भाई राणे हे उपस्थित होते. त्यांनी संदीप गावडे यांच्या या सामाजिक कार्याचे कौतुक केले आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, उपस्थित सर्व सफाई कर्मचाऱ्यांनीही गावडे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि या उपक्रमाबद्दल त्यांचे आभार मानले.
यावेळी बोलताना संदीप गावडे म्हणाले की, “आरोग्यदूत हे आपल्या शहराचे खरे हिरो आहेत. पावसातही ते न थकता आपले काम करत असतात. त्यांच्या कामाला सलाम म्हणून आणि त्यांना थोडी मदत व्हावी या उद्देशाने हा छोटासा
या उपक्रमामुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. पावसात काम करताना रेनकोट मिळाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. संदीप गावडे यांच्या या कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
