सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी येथील डॉक्टर परुळेकर नर्सिंग होममध्ये सामंत ट्रस्ट
मुंबईतर्फे गरजू व्यक्तींना धनादेश वाटप करण्यात आले. डिंगणे
येथील रक्तदाब व्याधीने पीडित प्रकाश सुतार, मोरगाव येथील मधुमेह
आणि रक्तदाब या आजाराने पीडित शहाजी सावंत, कोंडुरे – मळेवाड
येथील अर्धांग वायू आणि अपंगत्व आलेले सुरेश पालयेकर आणि
मधुमेह आणि रक्तदाब पिढीत चांदणी मुळीक, बिरोडकर – टेंब
सावंतवाडी येथील रक्तदाब आणि दम्याच्या आजाराने त्रस्त गंगाराम
बिरोडकर अशा पाच गरजू व्यक्तींना प्रत्येकी १० हजार रुपयांचे
धनादेश डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
सामंत ट्रस्ट तर्फे अशा गरजू व्यक्तींना अनेक वेळा मदत करण्यात येत
असते. या ट्रस्ट मार्फत सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे.
यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी सामंत ट्रस्ट व डॉ. जयेंद्र परुळेकर
यांचे आभार मानले आहेत.