सुदैवाने कोणतीही जिवीत हानी नाही;१लाख २० हजारांचे नुकसान
कुडाळ प्रतिनिधी
काल गुरुवारी २३ मे.रोजी रात्री जोरदार पडलेला पाऊस सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकटासह पाऊस पडला यात बऱ्याच ठिकाणचे विजेचे पोल,विजवाहिन्या,झाडे जमिनीवर कोसळून पडली आहेत.त्यामुळे कविलकाटे सह कुडाळ शहरातील काही भागात लाईट गेली आहे.त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.कुडाळ शहरातील कविलकाटे येथील श्री.रमेश परशुराम जळवी यांच्या राहत्या घरावर काल रात्री ८.३० वाजता भेलड्या माड चे झाड आणि रतांबी (कोकम) झाड पडल्याने रमेश जळवी यांचे मोठे नुकसान झाले आहे.घरावर दोन झाडे पडून सुमारे १ लाख २० हजाराचे नुकसान झाले आहे.
काल रात्री झालेला जोरदार वारा आणि पाऊस यामुळे मोठा आवाज येत रमेश जळवी त्यांच्या घरावर दोन झाडे कोसळली लगेच घाबरून घरातील सर्व माणसे ,लहान मुले यांनी घराचा मागील बाजूने घराबाहेर निघून गेली.त्यामुळे त्यांच्यावर सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.अचानक आलेला वारा,पाऊस यामुळे त्यांच्या घरावरील पत्र्याचे छप्पर आणि कौलारू छप्पर कोसळून यांचे नुकसान झाले आहे.अचानक घरावर झाडे कोसळल्याने घरातील लहान मुले,महिला घाबरून गेली.आज सकाळपासून त्यांनी त्यांच्या घरावर पडलेली दोन्ही झाडे कोयता, करवतीच्या सहाय्य|ने तोडून बाजूला केली आहेत.अचानक आलेल्या वारा पाऊस यामुळे जळवी कुटुंबावर हा प्रसंग ओढवला आहे.त्यांच्या घरावर झाडे पडल्यामुळे नुकसान झाले आहे आम्हाला लवकरात – लवकर ही नुकसान भरपाई मिळावी असे जळवी कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे.