भोसले नॉलेज सिटीमध्ये १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिनाचे आयोजन…
सावंतवाडी प्रतिनिधी “फादर ऑफ इंजिनियरिंग” भारतरत्न डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १५ सप्टेंबर रोजी साजरा होणारा अभियंता दिन यावर्षीही भोसले नॉलेज सिटीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, यंदा या कार्यक्रमाचे अकरावे वर्ष आहे. सोमवारी सकाळी ११ वा.बीकेसी सभागृहात हा कार्यक्रम संपन्न होईल. प्रमुख अतिथी म्हणून सार्वजनिक बांधकामचे नि.कार्यकारी अभियंता प्रदीप जोशी उपस्थित…
