संवेदनशील मनाचा राजकारणी- आमदार निलेश राणे!
ना गुलाल उधळला,ना विजयाचा उन्माद,ना रॅली ना डीवचनाऱ्या घोषणा. सिंधुदुर्ग प्रतिनिधी जिल्ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायतीचे निकाल जाहीर झाले. यात अतिशय हायहोल्टेज आणि प्रतिष्ठेच्या झालेल्या मालवण व कणकवली नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आमदार निलेश राणे यांनी बाजी मारत आपले उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी केले, या अभूतपूर्व विजयानंतर स्वाभाविकपणे आमदार निलेश राणे हे मोठ्या जल्लोषात रॅली वगैरे काढून विजयोत्सव करतील…
