विज्ञान व गणिताचा जादूगार राज्यस्तरीय स्पर्धेसाठी गौरव नाईक यांची निवड

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन आयोजित विज्ञान व गणिताचा जादूगार कोल्हापूर विभागस्तरीय स्पर्धेत जि. प. प्राथमिक शाळा कुडाळ कविलकाटेचे पदवीधर शिक्षक गौरव शंकर नाईक यांनी विजेतेपद पटकावले. नंदुरबार येथे होणाऱ्या विज्ञान व गणिताचा जादूगार राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. या स्पर्धेत ते राज्यस्तरावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तसेच कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यासाठी त्यांच्यावर शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (पुणे) मार्फत राज्यातील सर्व शिक्षकांसाठी राज्यस्तरीय विज्ञान व गणिताचा जादूगार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

गणितातील जादूचे प्रयोग कुडाळ तालुक्यातुन प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले होते व त्यांची
कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी झाली होती. सदर स्पर्धा सातारा येथे घेण्यात आली. या स्पर्धेत कोल्हापूर विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा या पाच जिल्ह्यांतील प्रत्येक तालुक्यांतील प्रथम आलेल्या शिक्षकांचा समावेश होता.

श्री. नाईक यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या धर्तीवर तयार केलेले विज्ञान व गणिताच्या जादूचे शैक्षणिक प्रयोग हे विशेष लक्षवेधी ठरले. श्री. नाईक यांच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कमळकर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सिंधुदुर्ग) चे प्राचार्य राजेंद्र कांबळे, अधिव्याख्याता संदीप पवार, कुडाळचे गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, केंद्रप्रमुख महेश परुळेकर, मुख्याध्यापक माधुरी राणे, शिक्षक, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी व शिक्षणप्रेमी यांनी अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page