राकेश परब मित्रमंडळ आयोजित चुनवरे महोत्सव २०२५

मालवण प्रतिनिधी
गुरुवार दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी राकेश परब मित्रमंडळाच्या वतीने चुनवरे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दिनांक २५, २६ व २७ डिसेंबर असा तीन दिवस चालणार असून या महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार २५ डिसेंबर

सायं. ४ वा : चित्ररथ यात्रा (पोईप बाजारपेठ ते चुनवरे मळा ढोलताशा, चित्ररथ व दिंडी यांचा सहभाग)

रात्रौ. ८ वा : महोत्सवाचे उद्घाटन

रात्रौ. ९ वा : भन्नाट विनोदी नाटक “ऑल दि बेस्ट”

शुक्रवार २६ डिसेंबर

सायं. ४ वा : स्मार्ट सुनबाई स्पर्धा (प्रत्येक वाडीमध्ये)

रात्रौ. ९ वा : साई कलामंच निर्मित साईनाथ एन्टरटेन्मेंट प्रकाशित “रंगी रंगला महाराष्ट्र”

शनिवार २७ डिसेंबर

रात्रौ ८ वा : स्मार्ट सुनबाई – महाअंतिम सोहळा (प्रमुख उपस्थिती – नागेश नेमळेकर भाऊजी)

रात्रौ १० वा : श्री. कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर निर्मित पौराणिक व ट्रिकसिनयुक्त दशावतारी नाटक “जोगुलांबा अर्थात कालसर्प भैरवी”

तरी सर्वांनी मोठ्या संख्येने या महोत्सवाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन राकेश परब मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page