मुख्याधिकारी नसल्यामुळे सावंतवाडी पालिकेचा कारभार “बेभान”…
आशिष सुभेदारांचा आरोप; तात्काळ कायमस्वरूपी अधिकारी नेमण्याची मागणी… सावंतवाडी, ता.०४: मुख्याधिकारी नसल्यामुळे सावंतवाडी शहराचा कारभार बेभान पद्धतीने सुरू आहे. कर्मचाऱ्यांना कोणतेही सोयर-सुतक नाही. त्यामुळे आरोग्याचे, पाण्याचे, रस्त्याचे अनेक प्रश्न रेंगाळले आहेत. त्यामुळे तात्काळ या ठिकाणी कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमण्यात यावा, अशी मागणी ठाकरे सेनेचे युवा नेते आशिष सुभेदार यांनी केली आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या सततच्या बदल्यांमुळे कामांचा खोळंबा…
