केसरकरांमुळे सिंधुदुर्गात शिवसेना,त्यांनी कधी स्वतःसाठी काही मागितले नाही पक्षाने त्यांना न्याय द्यायलाच हवा

शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या अनारोजीन लोबो यांची आर्थ हाक

सावंतवाडी (प्रतिनिधी)
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याने एका सत्याला पुन्हा उजाळा दिला – दीपक केसरकर हेच सिंधुदुर्गातील शिवसेनेचे मूळ बळ आहेत. सावंतवाडीत कदम यांच्या भेटीत महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेली मागणी याचेच प्रत्यंतर.

“केसरकरांमुळेच सिंधुदुर्गात शिवसेना आहे, त्यांनी कधी स्वतःसाठी काही मागितले नाही. पण आज पक्षाने त्यांना न्याय द्यायलाच हवा. मंत्रिपद द्या!” महिला आघाडीच्या या आर्त मागणीने वातावरण भारावून गेले. अनारोजीन लोबो यांच्या डोळ्यातून आलेले अश्रू म्हणजे केवळ भावनांचा उफाळा नव्हे, तर सिंधुदुर्गातील शिवसैनिकांच्या मनातील ठिणगी होती.

राज्यमंत्री कदम यांनी “एकनाथ शिंदे अन्याय करणार नाहीत, मंत्रीपदापेक्षा मोठी जबाबदारी देतील” असे सांगून परिस्थिती मऊ केली खरी; पण प्रश्न मात्र उभा राहतो – केसरकरांना मंत्रीपदापासून दूर ठेवणे हा न्याय आहे का?

सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांचे मनोबल, संघटनाचे अस्तित्व आणि पक्षाचा पाया हा केसरकरांवरच उभा आहे. त्यांना वारंवार वंचित ठेवणे म्हणजे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या आत्म्याशी खेळणे होय. आज सावंतवाडीतील हुंकाराने दाखवून दिले की – पक्ष नेते काहीही म्हणोत, जिल्ह्यातील शिवसैनिकांचा विश्वास केवळ दीपक केसरकरांवर आहे.

सत्ता समीकरणे वेगळी असतील, राजकीय समीकरणे वेगळी असतील; पण केसरकरांशिवाय सिंधुदुर्गात शिवसेना अपुरीच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page