कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलने घेतलेल्या स्पर्धेचा बक्षीस वितरण व पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न

कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल ने घेतलेला उपक्रमाचे मान्यवरांकडून कौतुक

सावंतवाडी प्रतिनिधी
कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या वतीने घेण्यात आलेल्या गणेश सजावट स्पर्धा व किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार सोहळा कार्यक्रम शनिवारी २५ जानेवरी काझी शहाबुद्धिन हॉल येथे संपन्न झाला
यावेळी माजी शिक्षणमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन उदघाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्थानचे राजे युवराज लखमराजे भोसले,युवराणी श्रद्धाराणी भोसले, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी पं स सदस्य संदीप गावडे, भोसले नॉलेज सिटीचे अध्यक्ष अच्युत सावंत भोसले, कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल चे संपादक सीताराम गावडे, दिनेश गावडे,ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला यामध्ये युवा उद्योजक म्हणून युवराज लखमराजे भोसले, युवराणी श्रद्धाराणी भोसले,श्रेयस मुंज,सौं. ऐश्वर्या शेट कोरगावकर, शरद पेडणेकर, संतोष कानसे, दिनेश गावडे, अक्षय काकतकर यांना देण्यात आला तसेच वैद्यकीय क्षेत्रातील देवदूत डॉ ज्ञानेश्वर दुर्भाटकर, जीवनगौरव पुरस्कार पत्रकार गजानन नाईक, आदर्श निवृत्त मुख्याध्यापक प्रा. व्ही. बी. नाईक, उत्कृष्ट मालवणी कवी दादा मडकईकर, उत्कृष्ट हार्मोनियम वादक मयूर गवळी, समाजभिमुख युवा पत्रकार विनायक गावस या सर्व सत्कारमूर्तीना पुरस्कार वितरण करण्यात आले. यानंतर गणेश सजावट स्पर्धेतील विजेते स्पर्धक तसेच किल्ले स्पर्धेचे विजेते स्पर्धक यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
उपस्थित मान्यवराने कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल ने घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल ने पुरस्कार वितरण च्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकांना न्याय देण्याचे काम कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल केले आहे असे गौरवउद्गार काढले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन ब्युरो चीफ विशाल पित्रे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page