प्रजासत्ताक दिनाच्या जनतेला दिल्या शुभेच्छा
सिंधुदुर्ग प्रतिनिधी
भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गनगरी येथे पालकमंत्री नितेश राणे यांनी शासकीय ध्वजारोहण केले. राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली व प्रजासत्ताक दिनाच्या जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार निलेशजी राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, एस.पी. सौरभ कुमार अग्रवाल, सीईओ मकरंद देशमुख, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या सह सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विविध विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
