१५ ऑगस्ट सकाळी १० वा होणार पालकमंत्री ना नितेश राणे यांच्या हस्ते होणार उद्घाटन;
अतुल बंगे
ओरोस (प्रतिनिधी)
ओरोस येथे जुना जिल्हा नियोजन सभागृह नुतनिकरण करुन अद्यावत केला असुन या सभागृहाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे पहीले आरमार प्रमुख मायनाक भंडारी यांचे सभागृहाला देऊन पालकमंत्री ना नितेश राणे यांनी समस्त भंडारी समाजाचा सन्मान केला आहे असे कुडाळ तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष अतुल बंगे यांनी आज पत्रकारांसमोर सांगितले
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भंडारी समाज भवन व्हावे ही मागणी पालकमंत्री ना राणे यांनी वेगाने प्रक्रिया सुरू असताना शासकीय दरबारी भंडारी समाजाच्या पराक्रमाचे अस्तित्व दीसले पाहिजे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहाला मायनाक भंडारी सभागृह असे नामकरण व्हावे ही मागणी पालकमंत्री ना राणे यांच्या केली होती या सभागृहाची पहाणी आज कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळ अध्यक्ष श्री अतुल बंगे, सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाज जिल्हा कार्याध्यक्ष राजु गवंडे आणि कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळ सचिव शरद पावसकर यांनी पहाणी केली व जिल्हाधिकारी अनिल पाटील, उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्याशी चर्चा केली व १५ आॅगष्ट या कार्यक्रमाचे नियोजन बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली या कार्यक्रमाला जिल्ह्यातील भंडारी समाजाच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली पाहिजे असे आवाहन श्री बंगे यांनी केले आहे
