सिंधुदुर्ग भाजपच्या माध्यमातून सावंतवाडीत 14 तारखेला तिरंगा दौड…

हर घर तिरंगा अभियान जिल्हा संयोजक संदीप गावडेंची संकल्पना; देशभक्ती आणि फिटनेसचा संदेश देणार.

सावंतवाडी प्रतिनिधी
भाजपचे हर घर तिरंगा अभियान जिल्हा संयोजक संदीप गावडे यांच्या संकल्पनेतून आणी महेंद्रा अकॅडमी यांच्या सहकार्यातून सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या माध्यमातून देशभक्ती आणि फिटनेसचा संदेश देणारी तिरंगा दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा दिनांक 14 ऑगस्टला सकाळी सव्वा सहा वाजता येथील शिवराम राजे भोसले उद्यान येथून सुरू होऊन पुन्हा तिथेच ती समाप्त होणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र मेडल आणि खास टी-शर्ट देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत सर्व वयोगटातील नागरिक सहभागी होऊ शकतात. यामध्ये महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र गट आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत: यात पुरूषांसाठी १०,०००,७,००० आणि ५,००० अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत तर १४ वर्षांखालील मुलांसाठी ३,०००,२००० आणी १००० अशी बक्षिसे असणार आहेत महिला गटासाठी ५,०००,३,००० आणि २,००० तर लहान मुलींसाठी: ३,०००, २,००० आणि १,००० अशी बक्षिसे आहेत.
ही स्पर्धा सावंतवाडी येथील सावंतवाडी उद्यानाकडे सुरू होऊन पुन्हा त्याच ठिकाणी समाप्त होणार आहे. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र मेडल खास टी शर्ट देण्यात येणार आहे. स्पर्धकांनी स्पर्धेच्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
तिरंगा दौड’च्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाचा आनंद साजरा करणे आणि नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम वाढवणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लवकरच नोंदणी प्रक्रिया सुरू होणार असून, जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
संपर्क –
महेंद्र सर – 902268 6944
अविष्कार सर – 7219096813

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page