सावंतवाडीच्या विकासासाठी एक रूपयाही कमी पडू देणार नाही:मंत्री नितेश राणे
भाजपच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद सावंतवाडी प्रतिनिधी “आमचे सर्व उमेदवार विजयी झाल्यानंतर सावंतवाडीच्या विकासासाठी एक रुपयाही कमी पडू देणार नाही. चारही नगरपंचायतींना जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी देवा भाऊ आणि मी नेहमी प्रयत्नशील राहू. त्यामुळे जनतेने भरभरून मतदान करून आमच्या उमेदवारांना विजयी करावे,” असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
