ग्रामपंचायतीत “बायोमेट्रिक” प्रणाली बसवण्याच्या सूचनाः गटविकास अधिकाऱ्यांचे आदेश..
सावंतवाडी (प्रतिनिधी)
ग्रामसेवक तथा ग्राम विकास अधिकाऱ्यांना “बायोमेट्रिक” प्रणाली सक्तीची करण्यात आली आहे. तसा आदेश सावंतवाडी गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतला दिले आहेत. त्यामुळे मिलिंद सावंत यांनी केलेल्या मागणीला अखेर यश आले आहे. याबाबत मनसे तालुकाध्यक्ष श्री. सावंत यांनी 15 ऑगस्ट पूर्वी हे बायोमेट्रिक न बसवल्यास आपण उपोषण करू असा इशारा त्यांनी दिला होता. मात्र त्यापूर्वीच प्रशासनाने याची दखल घेऊन मनसे तालुकाध्यक्षांच्या मागणी पूर्ण केल्याने त्यांनी ठेव उपोषण आता मागे घेतले आहे.
