आमदार होतो, तेव्हा चांगला निधी दिला.आता‌ तर सुवर्णसंधी

कणकवलीच्या विकासात दुसरा टप्पा महत्वाचा ;मंत्री नितेश राणे

कणकवली प्रतिनिधी

कणकवली शहरात सर्वांगिण विकास करण्यासाठी भाजपाचा सक्षम पर्याय आहे. शहरातील अद्ययावत भाजीमार्केट, चांगली ड्रेनेज व्यवस्था, पार्किंगसाठी चांगली व्यवस्था, अद्यावत गार्डन ही दुस-या टप्प्यातील कामे मार्गी लावली जातील. देशात मी जेव्हा आमदार होतो. तेव्हा चांगला निधी दिला. आता तर सुवर्णसंधी आली आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि तुमचा पालकमंत्री भाजपाचा आहे. जर आता आपण नगराध्यक्ष व नगरसेवक भाजपाचा निवडून दिल्यास निधी आणताना अगदी सोपे होईल. कणकवली शहर स्वच्छ, सुंदर बनवण्याची जबाबदारी माझी असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.

कणकवली येथील वॉर्ड क्रमांक 5 मधील भाजपचे उमेदवार मेघा गांगण यांच्या प्रचारार्थ गंगाराम सावंत यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या खळा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रभाग 5 भाजपच्या उमेदवार मेघा अजय गांगण, राजश्री धुमाळे, भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, प्रकाश सावंत, विशाल कामत, डॉ. संदीप नाटेकर, बंडू गांगण, पंढरी वायंगणकर,भाग्यलक्ष्मी साटम, सुधीर वालावलकर, उत्तम ताम्हणकर आदीसह या प्रभागातील अनेक नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page