रत्नागिरी प्रतिनिधी
आज आपल्या रत्नागिरी जिल्हा दौऱ्यात भाजपा नेते विशाल परब यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांची गणेशचतुर्थी निमित्त सदिच्छा भेट घेतली. श्री विशाल परब यांनी रत्नागिरीतील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या घरी गणेशदर्शनासाठी गाठीभेटींचा दौरा आयोजित केला होता. याच दरम्यान त्यांनी गणेश चतुर्थी निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी ॲड.अनिल निरवडेकर हे देखील उपस्थित होते. श्री विशाल परब आणि ॲड.अनिल निरवडेकर यांनी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांना पुष्पगुच्छ देत गणेश चतुर्थी निमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या.
भाजपा नेते विशाल परब यांनी घेतली रत्नागिरी जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांची गणेशचतुर्थी निमित्त सदिच्छा भेट
