सावंतवाडी (प्रतिनिधी)
पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायणराव राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्या माध्यमातून होडावडा बाजारपेठेत छत्री वाटप कार्यक्रम करण्यात आला. यावेळी परब यांच्या जनसंपर्क कार्यालयातील प्रतिनिधींनी बाजारपेठेतील स्थानिक व्यापारी, व्यावसायिक यांना छत्रीचे वाटप केले.
या आधी देखील विशाल परब यांच्या माध्यमातून सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग अशा विविध ठिकाणी छत्र्यांचे वाटप करण्यात आले आहे. ऊन आणि पावसापासून संरक्षण व्हावे या हेतूने त्यांनी राबवलेला उपक्रम स्तुत्य ठरत आहे. प्रसंगी भाजीपाला व्यवसायिकांनी परब यांचे आभार मानले.
प्रसंगी होडावडा उपसरपंच राजबा सावंत, सदस्य संदिप सातारडेकर, युवा गाव अध्यक्ष राजेश करंगुटकर, तालुका कार्यकारणी सदस्य प्रसाद परब, भाजपा गाव अध्यक्ष मनोहर नाईक, सूपरवॉरियर विजय रेडकर, तालुका कार्यकारणी सदस्य श्रेयस परब, विजय होडावडेकर, शिवराम केरकर आदी उपस्थित होते.