गोवेरी भगतवाडी साकवासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून ३० लाखांचा निधी मंजूर.

कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील गोवेरी भगतवाडी साकवासाठी आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार जिल्हा वार्षिक योजनेतून 30 लाखांचा निधी मंजूर झाला असून याबाबत आमदार निलेश राणे यांनी गोवेरीवासीयांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. याबाबत शिवसेना पदाधिकारी तथा माजी जि. प. अध्यक्ष संजय पडते, शिवसेना तालुकाप्रमुख विनायक राणे, दीपक नारकर यांनी आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले…

Read More

पालकमंत्री नितेश राणेंची शेतकऱ्यांप्रती वचनपूर्ती;सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांसाठी अवकाळी पावसाच्या नुकसानी पोटी ४.८६ कोटी मंजूर

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्वरित रक्कम जमा करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आदेश नागपूर प्रतिनिधी यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ऐन भातकापणीच्या हंगामात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्याबाबत पालकमंत्री नीतेश राणे यांनी तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देत लवकरात लवकर भरपाई दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता ऑक्टोबर महिन्यात झालेल्या भात-नाचणी नुकसानीपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय कडून ‘संत सेवा’ व ज्येष्ठ वारकरी पुरस्कारासाठी अर्ज मागविले

२०२५ सालासाठी संत सेवा,ज्येष्ठ वारकरी व कीर्तनकार पुरस्कारांचे दिले जाणार; १८ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन कणकवली प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्ग च्या वतीने दर वर्षी दोन वारकरी ना दिल्या जाणाऱ्या’ संत सेवा पुरस्कार व जेष्ठ कीर्तनकार साठी इच्छुकांनी अर्ज दाखल करावेत.वय वर्ष 65 पूर्ण असलेल्या ज्येष्ठानाच हा पुरस्कार दिला जातो.जेष्ठ मृदूंगमणी पुरस्कार दोन पुरस्कार,वय…

Read More

कोळंबी सोलणाऱ्या मच्छिमार भगिनींना मंत्री नितेश राणेंची विशेष भेट

मत्स्यव्यवसाय विभाग उत्तम दर्जाचे ग्लोव्हज वाटणार; मच्छी मार्केटमधील दुर्गंधीबाबत ठोस उपाययोजना करणार भाजपच्या आमदार उमा खापरे यांच्या मुद्द्यालावर मंत्री नितेश राणे यांची विधीमंडळात माहिती नागपूर प्रतिनिधी कोळंबी सोलताना मच्छिमार महिलांच्या बोटांना होणारा त्रास आणि मासळी बाजारातील अस्वच्छता-दुर्गंधीच्या समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी महत्त्वाचे आश्वासन दिले आहे. विधानपरिषदेत लक्षवेधी प्रश्नावर उत्तर देताना…

Read More

भोसले इंटरनॅशनल स्कूलची वेदा राऊळ तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम…

_सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या कु.वेदा प्रवीण राऊळ हिने ६ वी ते ८ वी या गटातून ‘सौर ऊर्जा एक उज्वल भविष्य’ या विषयावरील निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. शिक्षण विभाग, पंचायत समिती, सावंतवाडी व विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संस्कार इंग्लिश मिडियम स्कूल, निरवडे येथे पार पडले….

Read More

घर घर संविधान’ कार्यक्रमातून संविधानाची महती लोकांपर्यंत पोहोचणार

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सिंधुदुर्गनगरी दिनांक 08 (जिमाका) :-भारतीय संविधान हे भारताचे सर्वोच्च आणि मूलभूत कायदा आहे. देशाची राजकीय, सामाजिक, आर्थिक रचना कशी असावी, नागरिकांना कोणते हक्क असावेत याचे दिशादर्शन संविधान करते. भारतीय संविधान हे भारताचे सर्वोच्च आणि मूलभूत कायदे सांगणारे दस्तऐवज आहे. देशाची राजकीय रचना, नागरिकांचे मूलभूत हक्क व कर्तव्ये, तसेच शासनप्रणाली कशी चालवायची याचे…

Read More

क्लबमध्ये लागलेल्या आगीत देवसू येथील युवकाचा मृत्यु.

सावंतवाडी प्रतिनिधी गोवा येथील क्लबला लागलेल्या आगी मध्ये मृत पावलेल्या 25 जणांमध्ये देवसू येथील डॉम्निक डिसोजा यांचा समावेश आहे. त्यांच्या निधनाने देवसु गावावर शोककळा पसरली आहे. त्यांचे जन्मगाव देवसू असून सध्या ते गोव्यातील त्या क्लब मध्ये वेटर म्हणून कार्यरत होते. क्लब लागलेल्या आगीमध्ये क्लबच्या किचनमध्ये गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा असं कुटुंबीय…

Read More

सावंतवाडीत आयआयटी व मेडिकल अकॅडमीची सुरुवात

भोसले इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी–बारावी विज्ञान तसेच JEE–NEET–CET प्रशिक्षण सुरु.. सावंतवाडी प्रतिनिधी येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या अंतर्गत आयआयटी व मेडिकल अकॅडमीची सुरूवात करण्यात आली असून यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अकरावी-बारावी सायन्स शाखेसह जेईई, नीट, सीईटी यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांची तयारी स्थानिक पातळीवरच करण्यास मदत होणार असल्याचे भोसले नॉलेज सिटीचे…

Read More

निवती किल्ल्यावर स्वच्छता मोहीम संपन्न.!

दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे आयोजन कुडाळ प्रतिनिधी आज रविवार दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी किल्ले निवती येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. किल्ले निवतीवर दर वर्षी दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे स्वच्छता तसेच संवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात येते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत किल्ल्यावरील महादरवाजाची स्वच्छता करण्यात आली. झाडी झुडपांनी…

Read More

नारळ-सुपारी बागायत सक्षमीकरणासाठी कोलझर सोसायटीचा मेळावा यशस्वी

ग्रामीण सहकार सक्षमीकरणासाठी जिल्हा बँक पाठीशी:मनीष दळवी दोडामार्ग प्रतिनिधी तालुक्यातील नारळ आणि सुपारी उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोलझर विभाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड, कोलझर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘शेतकरी बागायतदार मेळावा’ मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात शेतकऱ्यांना आधुनिक आणि शास्त्रोक्त मार्गदर्शन मिळाले, तसेच ग्रामीण सहकार सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. ग्रामीण सहकार सक्षमीकरणासाठी…

Read More

You cannot copy content of this page