निवती किल्ल्यावर स्वच्छता मोहीम संपन्न.!

दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे आयोजन

कुडाळ प्रतिनिधी
आज रविवार दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी किल्ले निवती येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते.
किल्ले निवतीवर दर वर्षी दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे स्वच्छता तसेच संवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात येते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत किल्ल्यावरील महादरवाजाची स्वच्छता करण्यात आली. झाडी झुडपांनी झाकोळेला दरवाजा मोकळा करण्यात आला आहे.
या स्वच्छता मोहिमेत स्वप्निल साळसकर, ज्ञानेश्वर राणे, यतिन सावंत, प्रसाद पेंडूरकर, साईप्रसाद मसगे, हेमलता जाधव, समिल नाईक, गणेश नाईक यांनी सहभाग घेतला. सदर मोहिमेस शिवप्रसाद मुळीक यांनी ग्रास कटर उपलब्ध करून दिला त्यांचे प्रतिष्ठानच्यावातीने आभार व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page