क्लबमध्ये लागलेल्या आगीत देवसू येथील युवकाचा मृत्यु.

सावंतवाडी प्रतिनिधी
गोवा येथील क्लबला लागलेल्या आगी मध्ये मृत पावलेल्या 25 जणांमध्ये देवसू येथील डॉम्निक डिसोजा यांचा समावेश आहे. त्यांच्या निधनाने देवसु गावावर शोककळा पसरली आहे. त्यांचे जन्मगाव देवसू असून सध्या ते गोव्यातील त्या क्लब मध्ये वेटर म्हणून कार्यरत होते. क्लब लागलेल्या आगीमध्ये क्लबच्या किचनमध्ये गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा असं कुटुंबीय असून त्यांचे भाऊ सावंतवाडीमध्ये स्थायिक आहेत. ते काही वर्षांपूर्वी रेडी कनयाळ गावामध्ये स्थायिक झाले असून आज दुपारी त्यांच्यावर कनयाळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. देवसू गाव मध्ये ते शांत व म मनमिळाऊ असल्याने प्रत्येक घरात त्यांचे सलोख्याचे संबंध होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page