जनतेच्या आशीर्वादावर माझा विजय पक्का! :रूपेश कानडे
माणगाव प्रतिनिधी
माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघात प्रचाराचा वेग असून रुपेश कानडे व कौशल जोशी यांच्या प्रचाराची विशेष चर्चा सुरू आहे. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात विकास कामे झालेली आहे.त्यामुळे प्रचाराची घरोघरी जात असताना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून जनतेचा आशीर्वाद आणि भक्कम पाठिंबा लाभत आहे या पाठबळामुळेच आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास माणगाव जिल्हा परिषद महायुतीचे उमेदवार रुपेश कानडे व माणगाव पंचायत समितीचे उमेदवार कौशल जोशी यांनी व्यक्त केला
संवाद साधताना पुढे कानडे म्हणाले पाणीपुरवठा,रस्ते,आरोग्य, शिक्षण तसेच शेतकरी युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार त्याने व्यक्त केला.असून “विकास हेच अंतिम ध्येय” या भुमिकेने त्या मतदारांशी संवाद साधत आहे त्यांच्या प्रचारात भाजप शिवसेना महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला युवावर्ग आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहे.
