सतीश सावंत यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर पक्ष प्रवेश

कणकवली प्रतिनिधी
उबाठा सेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख तसेच जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचा आज शनिवार, १ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्ष प्रवेश होणार आहे. हा पक्ष प्रवेश कार्यक्रम पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असून, कणकवली तालुक्यातील हरकूळ बु. ग्रामपंचायत समोरील कोकण रिट्रीट हॉल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सतीश सावंत यांच्या भाजप प्रवेशामुळे कणकवली विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक पातळीवर त्यांचा मोठा जनसंपर्क असून, त्यांच्या प्रवेशामुळे भाजपची संघटनात्मक ताकद वाढेल, असा विश्वास पक्ष कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

या कार्यक्रमासाठी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सावंत समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page