लोरे नं.1 गावातील रस्त्यावरील अतिक्रमणविरोधात तिसऱ्या दिवशीउपोषण सुरूच..
वैभववाडी प्रतिनिधी15 ऑगस्ट 2024 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोरे नं.1 गावातील ग्रामस्थांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस असून, ग्रामस्थांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाविरोधात आपला आवाज उठविला आहे. लोरे नं.1गावातील सरपंचाने रस्त्यावर अतिक्रमण केल्याची तक्रार ग्रामस्थांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार केली होती….
