उंबर्डेतील तरुणीच्या मृत्यू प्रकरणी निष्काळजी डॉक्टरांवर कारवाई; अधीक्षकांची उचलबांगडी, वैद्यकीय अधिकाऱ्याची सेवा समाप्त
वैभववाडी प्रतिनिधी उंबर्डे (ता. वैभववाडी) येथील कु. सुंदरा प्रकाश शिवगण (वय २५) या तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील गंभीर निष्काळजीपणावर अखेर कठोर कारवाई करण्यात आली आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अर्जुन नरोटे यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली असून, वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल माकोडे यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. घटनेनुसार, बुधवारी संध्याकाळी कु. सुंदरा…
