परतीच्या अवकाळी पावसामुळे गोठोस परिसरातील शेतीचे मोठे नुकसान
कृषी विभागाच्या सहाय्याने महसूल विभागाने पंचनामे करून शेतकरी वर्गाला दिलासा द्यावा:शेतकरी चिंतेत कुडाळ तालुक्यातील गोठोस गावातील गेल्या काही मागील पाच दिवस पडत असलेल्या परतीच्या पावसामुळे भात शेतीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहेत.तीन महीने मेहनत करून हातातोंडाशी आलेल्या शेतीचे होणारे नुकसान बघून गोठोस परीसरातील शेतकरी चिंतेत दीसून येत आहेत.
