अबिद नाईक यांच्या सहकार्याने महिलांना देवदर्शन

कणकवली प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक अबिद नाईक यांच्या पुढाकाराने कणकवली शहरातील शिवाजीनगर, जळकेवाडी आणि परबवाडी प्रभागातील ६० महिलांना श्रावण महिन्यानिमित्त देवदर्शनासाठी पाठवण्यात आले. गेली १२ वर्षांहून अधिक काळ नाईक हे हा उपक्रम राबवत आहेत. या वर्षी या महिलांना देवगडमधील श्रीदेव कुणकेश्वर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीदेव मार्लेश्वर येथे दर्शनासाठी रवाना करण्यात आले.

Read More

You cannot copy content of this page