दहावीचा पेपर देऊन तिने केले आईवर अंत्यसंस्कार..
मुलीच्या धाडसाचे आणि तिला साथ देणाऱ्या समाजातील सुधारणावादी कार्यकर्त्यांचेही अभिनंदन.. सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा जाधववाडीत एका मुलीने सकाळी दहावीचा गणिताचा पेपर लिहून दुपारी आपल्या आईवर अंत्यसंस्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने मुलीच्या धाडसाचे आणि तिला साथ देणाऱ्या समाजातील सुधारणावादी कार्यकर्त्यांचेही अभिनंदन होत आहे. सातार्डा जाधववाडीतील सौ. रुपाली राजन जाधव (४८) या महिलेचे रविवार…
