आ.दिपक केसरकर यांनी घेतले शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या गणरायाचे दर्शन…
सावंतवाडी प्रतिनिधी राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आ. दीपक केसरकर यांनी आज शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या मडूरा येथील निवासस्थानी विराजमान असलेल्या गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी परब कुटुंबीयांकडून आमदार केसरकर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. दरम्यान यावेळी आ. दीपक केसरकर यांनी संजू परब आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी आणि पदाधिकारींशी आपुलकीयुक्त संवाद साधत सुख-दुःखाची विचारपूस…
