सीड बॉल हरित भविष्य घडवण्याचा सोपा मार्ग; गणेश नाईक
सिंधुदुर्ग प्रतिनिधी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक विचारांची रुजवणूक करणे, स्थानिक जैवविविधता वाढवणे तसेच वृक्षलागवड व निसर्गसंवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये पालकांनी आपल्या पाल्याॱकडून सीड बॉल बनवून घेणे गरजेचे आहे. काही वर्षापूर्वी आपल्या जिल्हा परिषद मार्फत शालेय विद्यार्थ्यांकडून सीड बॉल बनविण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आलेला होता. त्यात जिल्ह्यातील बहुतेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. अशाप्रकारच्या…
