भाजप युवा नेते विशाल परब यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले, गर्दीचा उच्चांक मोडला
सावंतवाडी प्रतिनिधी
विशाल परब यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जनसेवेसाठी रुग्णवाहीका लोकार्पण करत रुग्णसेवेसाठी टाकलेले पाऊले अभिमानास्पद आहे, त्यांनी आपले कार्य असेच अविरत सुरु ठेवावे असे गौरवोद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी काढले. भाजपा युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी विशेषतः सावंतवाडी मतदारसंघासाठी सहा रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा आज मंत्री चव्हाण यांच्या हस्ते पार पडला यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सावंतवाडी मोती तलावाच्या काठावर शिवराम राजे भोसले पुतळ्या नजिक अफाट जनसमुदायाच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत महिला जिल्हाध्यक्ष श्वेता गावकर युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब सौभाग्यवती वेदिका परब प्रभाकर परब विकास परब अनिल निरवडेकर मनोज नाईक राजू बेग
सुधीर आडिवरेकर अक्रम खान दिलीप भालेकर
केतन आजगावकर माझी पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते
