सावंतवाडी येथील माजी नगरसेवक नासीर शेख तीन जिल्ह्यातून हद्दपार

विविध गुन्ह्यांची नोंद घेऊन पोलीसांच्या अनुषंगाने प्रांताधिकारी हेमंत निकम यांची कारवाई

सावंतवाडी (प्रतिनिधी)
येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीत महिलांना त्रास देऊन दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या माजी नगरसेवक नासीर अहमद ईस्माईल शेख (वय ५७, रा. सालईवाडा, सावंतवाडी) याला आज प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग पोलिसांनी तीन जिल्ह्यांतून एक वर्षासाठी तडीपार केले आहे.

माजी नगरसेवक नासीर शेख याच्याविरुद्ध सावंतवाडी पोलिस ठाण्यात अनेक दखलपात्र गुन्हे दाखल आहेत. तो महिलांना त्रास देऊन परिसरात दहशत निर्माण करत होता आणि त्याच्या वर्तनात
सुधारणा होत नसल्याने त्याच्याविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव सावंतवाडी पोलिसांनी पाठवला होता. कारवाई. तत्कालीन पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी याबाबतचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सादर केला होता त्यानुसार, नासीर शेखला सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतून एका वर्षासाठी हद्दपार केले आहे आणि त्याला यासंबंधीची नोटीन बजावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page