सिंधुदुर्ग प्रतिनिधी
हिवाळे बौद्धवाडी धुरीवाडी यांना जोडणारा साकव अतिवृष्टीमुळे वाहून गेला होता, यामुळे हिवाळे धुरीवाडी गवळीवाडी मुळयेवाडीचा संपर्क तुटला होता. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी हिवाळे येथे भेट देऊन या साकवाची पहाणी केली. या वेळी निलेश राणे यांच्या सोबत माजी वित्त बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण माजी सभापती सुनिल घाडीगांवकर सरपंच रघुनाथ धुरी ग्रामस्थ राजेंद्र हिवाळेकर रमेश राठोड बळीराम धुरी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
अतिवृष्टीत वाहून गेलेल्या हिवाळे धुरीवाडी येथील साकवाची भाजपा नेते निलेश राणे यांच्याकडून पाहाणी…
