भोसले टेक्नॉलॉजी येथे शासकीय प्रवेश सुविधा केंद्र उपलब्ध…
सावंतवाडी प्रतिनिधी
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता पदवी अभियांत्रिकीची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया शासनातर्फे सुरू करण्यात आली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून 27 जुलैपर्यंत विद्यार्थी ऑनलाइन अर्ज भरू शकतात. यासाठी शासनाने जिल्हानिहाय स्क्रुटीनी सेंटर्स सुरू केली असून यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे शासनाचे अधिकृत प्रवेश सुविधा केंद्र (एससी ३४७०) उपलब्ध आहे._
याठिकाणी ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रांची छाननी, तक्रार निवारण, कॅप राऊंड पर्याय निवडणे व समुपदेशन इत्यादी गोष्टी निःशुल्क स्वरूपात उपलब्ध आहेत. यावर्षी सीईटीचे पर्सेंटाइल वाढल्याने प्रवेशासाठी चढा ओढ होण्याची चिन्हे आहेत. विशेषतः अधिक गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासक्रम आणि कॉलेज मिळवण्यासाठी कमालीची चुरस होण्याची शक्यता आहे. राज्यात बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सर्वाधिक प्रवेश अभियांत्रिकीला होतात. इच्छुक विद्यार्थ्यांनी केंद्रीभूत प्रवेशासाठी लवकरात लवकर नोंदणी करावी असे आवाहन एस.सी.सेंटर प्रमुख प्राचार्य डॉ.रमण बाणे यांनी केले आहे.