“पुन्हा उद्धवजी मुख्यमंत्री.. ही निष्ठावंतांची खात्री” चा दिला नारा*
माणगाव प्रतिनिधी
उद्धवजी ठाकरे यांना पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावात निष्ठा यात्रा काढण्यात येणार आहे. आज गुरुवारी या निष्ठा यात्रेचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली माणगाव येथे करण्यात आला. प्रथमतः माणगाव येथील श्री. दत्तमंदिर टेंबेस्वामी मठ येथे दर्शन घेत श्रीफळ वाढवून निष्ठा यात्रेला सुरुवात करण्यात आली. सलग ४५ दिवस हि निष्ठा यात्रा सुरु राहणार आहे. माणगाव येथे पहिल्याच दिवशी या निष्ठा यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. पुन्हा उद्धवजी मुख्यमंत्री ही निष्ठावंतांची खात्री अशी टॅगलाईन निष्ठा यात्रेला देण्यात आली आहे.
दरम्यान माणगाव येथील प्रत्येक बुथवर शिवसैनिक व नागरिकांशी संवाद साधण्यात आला. यावेळी आमदार वैभव नाईक व इतर नेत्यांनी मार्गदर्शन केले. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्र राज्यात खूप चांगला कारभार केला. कोरोना महामारी, पूरस्थिती, चक्रीवादळ अशा अनेक संकाटातुन महाराष्ट्राला वाचविण्याचे काम त्यांनी केले. मात्र शिवसेना पक्षातील काही आमदारांनी गद्दारी करून विश्वासघात केल्याने त्यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. मात्र आता पुन्हा एकदा सन्मानाने उद्धवजी ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याचा संकल्प निष्ठावंत शिवसैनिकांनी यावेळी केला.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी,उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, युवासेना मालवण तालुका समन्वयक मंदार ओरसकर, अतुल बंगे, रामा धुरी,माणगाव विभागप्रमुख बंड्या कुडतरकर,सरपंच मनीषा भोसले,उपसरपंच बापू बागवे,अजित करमलकर, विभाग संघटक कौशल जोशी,रामा ताम्हाणेकर,उपविभागप्रमुख एकनाथ धुरी,अनुप नाईक,सुशील चिंदरकर,राजू गवंडे,संदीप म्हाडेश्वर, संदीप सावंत,कृष्णा तेली,सचिन आचरेकर, शाखा प्रमुख बाबा परब,बंटी भिसे,बाबू कदम,शैलेश विर्नोडकर,रूपेश धारगळकर,अवधूत गायचोर,ईश्वरी सावंत,काजल नाईक,मनाली धुरी,संजय धुरी,रमेश हळदणकर, राजू गावडे,विनायक नाईक,संजय धुरी,अक्षय रेवंडकर आदींसह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व माणगाव वासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.