आजच्या गुरु पौर्णिमेच्या दिवशी हा माझा गुरुसंदेश: पं.पू.सदगुरू श्री गावडे काका महाराज
कुडाळ प्रतिनिधी
गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व असतं गुरु शिष्याचं नातंं दृढ कण्याच ,.ज्ञानाचा उगम जिथे होतो. जीवनाची परिपूर्णता ज्या ठिकाणी तयार होते. जीवनाची वाटचाल जिथे तयार होते, कौटुंबिक वातावरणात आनंद निर्माण होण्याचा मार्ग ज्या ठिकाणी मिळतो. दुःख आणि संकटावर ज्या ठिकाणी मात करण्याचा आशीर्वाद आणि शक्ती मिळते , मोक्ष आणि मुक्ती चा मार्गमिळविण्याचं व मनाला एकाग्रता ज्या ठिकाणी मिळते ते ठिकाण म्हणजे सद्गुरु चरण.हेच गुरुचे महत्त्व असतं दातृत्व भावना ही आपणाला जीवनामध्ये पुण्याचा मार्गआपलं जीवन सार्थकी लावण्यांचा मार्ग शिकवतेआपण जन्माला आलो की आपणाला पहिले गुरू भेटतात ते आपले आई वडील ,त्यानंतर आपले शिक्षक आपली शैक्षणिक परीक्रमा पूर्ण होऊनआपण एका उच्च विचार सारणीने आपल्या तारुण्याचा जीवनामधला आनंद घेत असताना यशस्वी जीवनाच्या पायरीवर जेव्हा पहिलं पाऊल ठेवतो आणि जिथून आपल्या प्रपंचाची सुरुवात होते आणि या प्रापंचिक वळणावर प्रापंचित आनंदाच्या ठिकाणी जे ज्ञानप्राप्त करून देण्यासाठीआणि प्रपंचात सुखदुःखाच्या अनुभवाच्या गोष्टी सांगून प्रपंच कसा करावा ,प्रपंच करत असताना परमार्थाची कास कशी धरावी.त्यासाठी आपल्याला गुरुची गरज असते.आणि तेच असतात जीवनातले आध्यात्मिक गुरु .अध्यात्मिक गुरु आपणाला चांगल्या वळणावर नेतात व शेवटच्या क्षणापर्यंत आपणाला मायेने व ममतेने वात्सल्याने ,दिव्यत्वाचा संदेश देत असतातआपणाला परमेश्वराची ओळख करून देऊन या परमेश्वराचं खरं रूप दाखवितात.उपासना म्हणजे परमेश्वराची सेवा या सेवेचे महत्व पटवून देतात.आपणाला साधक बनवितात.आपणाला आत्मपरीक्षण करून देऊन यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवितात ते खरे सद्गुरु असतात समाजाची सेवा हाच समाज रुपी परमेश्वर आहे. असं मार्गदर्शन करत असतात गुरुची कृपा व गुरुचा आशीर्वाद हाच मोक्ष आणि मुक्तीचा मार्ग आहे.गुरुंनी दिलेला शब्द हा अंतिम सत्य आहे,म्हणून गुरु निंदा करू नका सद्गुरु आपणाला वेगवेगळ्या सेवा देत असतात वेगवेगळ्या सेवेतुन आपल्याला ज्ञान देत असतात.मानव रुपी परमेश्वराची सेवा करण्याची संधी देत असतात
ती भक्ती मार्गातुन.
आज पासून येणाऱ्या पुढच्या वर्षापर्यंत आपल्या सर्वाच्या स्वतःच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडूवा हीच खरी मला गुरुदक्षिणा असे असा संकल्प आपण यावर्षी करूया
कार्यक्रमाच्या वेळी मन ही एक अद्भुत शक्ती या कार्यक्रमात सहभागी होऊन दहावी व बारावीच्या परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला यासोबत योगशिक्षकांचाही सन्मान करण्यात आला .विशेष गुणगौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्यात दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावलेली कुमारी अर्पिता अमेय सामंत हिला सन्मानित करण्यात आलं. प्रभाकर तुकाराम गावडे (मुंबई ) (मुंबई)मंगलदास शंभू गाड (गोवा) ,श्रीमती स्मिता वासुदेव आंबेस्कर (सावंतवाडी)श्रीमती सुमन मधुसूदन किनळेकर (सावंतवाडी) श्रीमती सरोजिनी दशरथ गावडे (माडाची वाडी) ,श्रीमती ,सुनंदा आबा कोरगावकर (गोवा) ,श्रीमती शुभांगी दिगंबर कोयरेकर(मसदे)बापू लक्ष्मण पाटकर (मसदे)या सर्वांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.सौ सौ केसर गोविंद वानिवडेकर (कुडाळ),सौ रश्मी हर्षल डिचोली, (दिवा)यांना वासल्य माय या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सद्गुरूंच्या भक्तिमार्गात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल मंगेश परशुराम बिरजे (बेळगांव) श्रीमती ज्योती प्रकाश पाटील (बेळगाव)सोनू सुरेश धावडे (मुंबई)दीपिका विलास मोरजकर (कणकवली) सौ.रक्षाली देवानंद कवळेकर (गोवा)या सर्वांना परमपूज्य सद्गुरु श्री गावडे काका महाराजच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमात श्री सद्गुरु संगीत विद्यालय सावंतवाडीच्याा कलाकारांनी भक्ती गीतातून रंगत आणली.यावेळीचे अध्यक्ष एकनाथ गावडे (धार्मिक)दत्तात्रय किनळेकर (सामाजिक)पंकज कामत ,विजय साहिल ,भास्कर गावडे, बापू गावकर, मनीष नाईक,महेश वेंगुर्लेकर, देविदास रेडकर, सौ प्रीती कुशे सौ केसर वानिवडेकर,नितीन पिंगुळकर गिरीधर गावडे,अमित कोरगावकर उपस्थित होते .यदांचा पाद्यपुजेचा मान गोव्याला देण्यात आला. श्री स्वामी समर्थ श्रध्दा भक्त सेवा न्यासचे अध्यक्ष अमीत कोरगांवकर यानी सपत्नीक पाद्य पुजा केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश केसरकर आणि आनंद सावंत यांनी केले.
