लाखो रुपयांचे नुकसान: मात्र सुदैवाने जीवित हानी टळली*
कुडाळ तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने माणगाव खोऱ्याला चांगलेच झोडपले. आज दुपारी दोन च्या सुमारास मोरे येथील पोल्ट्री फार्मर दिनेश शिंदे यांची स्वतःच्या मालकीची पोल्ट्री शेड वादळी वाऱ्यास पावसाने पूर्णपणे जमीन दोस्त झाली.जोराचा वारा सुटल्याने ठिकठिकाणी झाडे ही उन्मळून पडली आहे
दिनेश शिंदे यांच्यावर अवकाळी पावसाबरोबर वादळी वाऱ्याने एक संकट आले.मोठ्या प्रमाणात शेडचे लाखोंचे नुकसान झाले.
सिंधुदुर्ग जिल्हा पोल्ट्री फार्म संघटनेचे अध्यक्ष दिनेश शिंदे आहेत. पोल्ट्री शेड चे लवकरात लवकर प्रशासनाकडून नुकसानीचा पंचनामा व्हावा.तात्काळ भरपाई मिळावी अशी मागणी दिनेश शिंदे यांच्याकडून होत आहे.
