कुडाळ (प्रतिनिधी)
हुमरमळा वालावल येथील श्री अतुल बंगे मित्र मंडळ आयोजित दहीहंडी उत्सवात कुडाळ मालवण मतदार संघाचे लोक प्रिय आमदार वैभव नाईक यांचे हुबेहूब प्रतिकृती रेखाटलेली होती यावेळी कु प्रेम याचा सन्मान आम नाईक यांनी केला होता.
कु प्रेम हा अभ्यासामध्ये खुप हुशार असुन त्याला आर्टिस्ट ची खुप आवड असुन अनेकांची हुबेहूब प्रतिकृती रेखाटत असतो!
कु प्रेम याचे सर्वत्र कौतुक होत असुन आंतराराष्ट्रीय चित्रकार होण्यासाठी त्याची धडपड निश्चितच कौतुकास्पद आहे!
हुमरमळा वालावल पडोसवाडी येथील सामान्य कुटुंबातील कु प्रेम हा आजोबा सुतार काम करीत असुन वडील भगवान हा अतिशय प्रामाणिक पणे छोट्या रोजगार कडे असुन कु प्रेम याची आई सौ भक्ती ही महिलांच्या सामाजिक कामात सहभाग असतो!आजी भारती परब ही महीलांबचत गटांच्या माध्यमातून काम करीत आहेत!
अशा या कु प्रेम यांच्या कलेची दखल शिक्षकवर्ग घेत असुन हुमरमळा वालावल गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री अतुल बंगे कायमच दखल घेऊन कु प्रेम ला प्रोत्साहन देत आहेत!