कुडाळ (प्रतिनिधी)
येथील जिजामाता चौक आणि काळप नाका
येथे सार्वजनीक ठिकाणी एकमेकांच्या अंगावर धावून जात शांतता भंग
केल्याप्रकरणी भाजप आणि ठाकरे गटाच्या एकूण 11 जणांवर
पोलिसांनी कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी
सायंकाळी नारळी पोर्णिमेनिमित काढण्यात आलेल्या मिरवणुकीत
दोन गटात शाब्दिक चकमक होऊन त्याचे रुपांतर एकमेकांच्या
अंगावर धावून जाण्यात झाले होते.
कुडाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी शहरातून भाजप आणि ठाकरे गटाच्या वतीने नारळी पोर्णिमेनिमित दोन स्वतंत्र मिरवणुका काढण्यात आल्या. मिरवणूक ठाकरे गट कार्यलयासमोर आली असता भाजप आणि ठाकरे गट कार्यकर्त्यांत शाब्दिक बाचाबाची झाली आणि एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. त्यानंतर काळप नाका येथे सुद्धा हा प्रकार घडला.
या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी युवा सेना उप जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट (35), ठाकरे गट तालुका प्रमुख राजन शिवराम नाईक (52), जिल्हा प्रमुख संजय धोंडदेव पडते (55), संदीप सूर्यकांत महाडेश्वर (30), अमित विजय राणे (32) भाजपचे माजी तालुका प्रमुख विनायक देऊ राणे (51), नगरसेवक रामचंद्र मोहन परब (45), शेखर राणे (30), अनंत उर्फ आबा प्रवीण घडाम (35) सर्व राहणार कुडाळ 10) प्रसन्ना बाबाजी गंगावणे (25) रा पिंगळी आणि आनंद भास्कर शिरवलकर (44) रा कुडाळ तालुका कुडाळ यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 BNS 194(2), 221 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी संचयित आरोपित नंबर 11 याने आपले शासकीय कर्तव्य पार पाडत असताना त्यांना अटकाव केला म्हणून वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कुडाळ ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र सहदेव कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. पालवे अधिक तपास करत आहेत.