कुडाळ तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित…
कुडाळ प्रतिनिधी
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा सिंधुदुर्ग तालुका कृषी अधिकारी कुडाळ कार्यालय व ग्रामपंचायत वसोली यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव 2024 चे आयोजन वसोली हायस्कूल येथे शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी दहा पासून करण्यात आले आहे. सदर महोत्सवामध्ये विविध रानभाज्या व औषधी वनस्पती प्रदर्शनात मांडण्यात येणार असून रानभाज्यांपासून बनविलेल्या विविध प्रक्रिया व खाद्यपदार्थांचे प्रदर्शन व स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली आहे. तसेच महोत्सवादरम्यान रानभाज्यांचे आहारातील महत्त्व व त्यांचे लागवड तंत्रज्ञान याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना रानभाज्यांपासून बनविलेल्या पाककला स्पर्धेत भाग घ्यावयाचा असेल त्यांनी आपले गावाचे कृषी सहाय्यक यांचेकडे बुधवार दिनांक 21 ऑगस्ट 2024 पर्यंत संपर्क व नाव नोंदणी करावी.तरी शेतकऱ्यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कुडाळ कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.