बांदा (प्रतिनिधी)
येथील केंद्र शाळेचे उपक्रम शिक्षक जगदीश पाटील यांना राज्य शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण ५ सप्टेंबरला मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. गेल्या २० वर्षातील सेवेच्या कालावधीत त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले. त्यांच्या कायद्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
बांदा येथील जे.डी.पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
